Ticker

6/recent/ticker-posts

मेट्रो स्थानकाच्या परिसरात पार्किंग ची व्यवस्था करावी -युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मयुर पवार यांच्या तर्फे आयुक्त राजेश पाटील साहेब  यांना मेट्रो स्थानकाच्या परिसरात  पार्किंग व्यवस्था करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले व निवेदनात असे नमूद केले की पुणे मेट्रो चे काम आता जवळ जवळ पूर्ण झालेले आहे पण मेट्रो स्थानकाच्या परिसरात पार्किंग ची व्यवस्था किंवा गाडी लावल्यासाठी कुठेही मोकळी जागा दिसत नाही.

भविष्यात मेट्रो ने प्रवास करणाऱ्यांना पार्किंगअभावी गैरसोयीचा सामना करावा लागेल . पिंपरी चिंचवड शहरातील निगडी ,आकुर्डी , चिंचवड, रावेत ,मोशी वरून नागरिक स्वतःच्या वाहनाने मोरवाडी पर्यंत येतील  आणि मेट्रो स्थानक परिसरात प्रशस्त पार्किंग नसेल तर प्रवाशांना त्याचा त्रास होईल .

त्यामुळे मी आपणास विनंती करतो की प्रत्येक स्टेशन च्या बाहेर पार्किंग ची व्यवस्था करावी जेणेकरून मेट्रो ने प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होणार नाही.

Post a Comment

0 Comments