Ticker

6/recent/ticker-posts

ढिसाळ नियोजन व उद्धट वर्तन करणाऱ्या प्रभारी आगार प्रमुख यांची चौकशी होऊन बदली व्हावी

ढिसाळ नियोजन व उद्धट वर्तन करणाऱ्या प्रभारी आगार प्रमुख सागर पाटील यांची चौकशी होऊन बदली व्हावी - राधानगरी पं . स . माजी सभापती व विद्यमान पं .स . सदस्य श्री दिलीप कांबळे .  

राधानगरी लाईव्ह विशेष वृत्त
सुनिल पाटील
          राधानगरी तालुक्यातील एसटी आगार मध्ये. सागर पाटील हे प्रभारी आगार प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहेत. राधानगरी तालुका हा डोंगराळ व दुर्गम असलेने वाड्या वस्त्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे . तसेच या तालुक्या मध्ये शाळकरी व कॉलेज व रोजच्या कामानिमित्त बाहेर गावी तसेच तालुक्या मध्ये जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते . दळणवळणाच्या दृष्टीने एसटी हे ग्रामीण भागाचे महत्त्वाचे साधन आहे श्री .पाटील ह्यांनी आगाराचा प्रभारी पदभार स्विकारले पासून एसटी गाड्यांचे नियोजन ढिसाळ झाले असलेने प्रवाशांमधून व लोकांचे मधून त्यांच्या कामकाजाविषयी तक्रारी प्राप्त होऊन मोठ्या प्रमाणात प्रवाशांची नाराजी होऊन हेळसांड होत आहे . त्यामुळे प्रवासी हे दुसरा पर्याय शोधत आहेत. त्याचा आर्थिक फटका आगाराला सोसावा लागत आहे .            श्री . पाटील यांना आगाराचे कामकाज , व गाड्यांचे नियोजन यांबाबत आगारामध्ये भेट देणेसाठी गेलो असता दोन ते तीन वेळा श्री . पाटील हे भेटलेले नाहीत . ते आगारामध्ये वारंवार गैरहजर आसले मुळे त्याचाही फटका आगाराला बसत आहे . गेली दोन वर्ष आगारा भोवती बांधणेत आलेली संरक्षण भित पडलेली होती ती परत बांधणे बाबत पाठपुरावा करून ही त्याची पुर्तता होत नसलेबाबत विचारणा केली असता त्यांचे कडून समाधान कारक उत्तर न येता आरे रावीची भाषा व उडवा उडवीची उत्तरे येत होती . या जबाबदार पदावर असताना त्यांनी समाधान पुरक उत्तरे देणे आपेक्षित असते परंतु तसे त्यांचेकडून होत नाही . आगारामध्ये एसट्यांची कमतरता , व एसटीच्या फेऱ्यांचे नियोजन अभावी प्रवाशांचे हाल होत आसतेच त्याचबरोबर त्यांचे उद्धट बोलणे व वर्तणूक यामुळे कामगार व कर्मचारी यांचेमध्ये आस्वस्थता होत आहे त्यामुळे त्यांच मनमानी कारभारा बाबत कर्मचारी व अधिकारी यांचेही वादविवाद होऊन तक्रारी होत आहेत . त्यांमुळे श्री . पाटील यांच्या कामकाजाची चौकशी होऊन या तालुक्यातून त्यांची तात्काळ बदली करणेत यावी ही विनंती . निवेदनाच्या प्रति , - मा .श्री . अनिल परब सो , परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई , मा . श्री . हसनसो मुश्रीफ सो , ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई , मा . श्री . सतेज उर्फ बंटी पाटील सो , पालकमंत्री जिल्हा कोल्हापूर व राज्यमंत्री गृह व गृह निर्माण महाराष्ट्र राज्य मुंबई .

Post a Comment

0 Comments