Ticker

6/recent/ticker-posts

राज्य सरकारने MSEB चे शेतकऱ्यांचे बील भरले आहे; बिलाची रक्कम 2927.74 कोटी रुपय.

राज्य सरकारने MSEB चे  शेतकऱ्यांचे बील  भरले आहे; बिलाची रक्कम 2927.74 कोटी रुपय.

 आता कनेक्शन कोणी तोडणार नाही

_सुनिल पाटील,_
_संपादक राधानगरी लाईव्ह_

राज्यातील कृषी पंप ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित
यांना द्यावयाचे अर्थसहाय्य (समायोजन) सन 2021-22. 
महाराष्ट्र शासन 
ऊद्योग, ऊजा व कामगार विभाग 
शासन निर्णय क्र. बीयुडी-2021/प्र.क.50/ऊजा-3 
मादाम कामा मागथ, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - 400 032.
दिनांक : 24 नोव्हेंबर, 2021
संदर्भ:-
1) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक अर्थस-2021/प्र. क्र. 48/अर्थ-3, दि. 06 एदप्रल, 2021 
2) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक अर्थस-2021/प्र. क्र. 48/अर्थ-3, दिनांक 24 जुन, 2021
3) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. पूरक- 2021/प्र.क्र.78/अर्थ-3, दि. 20जुलै, 2021.
4) महावितरण कंपनीचे पत्र क्र. मु.अ.(वा)शासन/वीजदर सवलतीपोटी निधी/022220, 
दि.21 सप्टेंबर, 2021. 
प्रस्तावना :-
राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी 
मर्यादित कडून वीज दरात सवलत देण्यात येते व त्याची प्रतिपूर्ती शासनाकडून महावितरण कंपनीस केली 
जाते. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस कृषी पंप ग्राहकांना अर्थसहाय याकरीता वित्तीय वर्ष 2021-22
मध्ये मागणी क्रमांक के-६ मुख्य लेखाशिर्ष 28015572 या लेखाशीर्षाखाली रू.5300.00 कोटीची 
अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली आहे. त्यामधून रु. 361.00 कोटी रक्कम दिनांक 29 जुन, 2021 च्या
आदेशान्वये समायोजित करण्यात आली आहे. आता वित्त विभागानेअनुमती दिल्यानुसार रु. 2927.74 कोटी
रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस समायोजनाने उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या 
विचाराधीन होती. 
 
शासन निर्णय :-
कृषीपंप ग्राहकांना सन 2020-21 या आर्थीक वर्षात वीज दरात दिलेल्या सवलतीसाठी महाराष्ट्र 
राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना देय असलेल्या अनुदानाच्या रक्कमेपैकी रु.2927.74 कोटी 
(रुपये दोन हजार नऊशेसत्तावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख फक्त) रोखीने वितरीत न करता समायोजनाने 
वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे. 
2. उक्त प्रयोजनासाठी होणारा खर्च “मागणीक्रमांक के-6, 2801 वीज, 05 पारेषण व वितरण, 104, 
वीज विकास व्यवस्था राष्ट्रीय भार, (०१) वीज दरात सवलत, (01) (01) कृषीपंप ग्राहकांना वीजदर सवलत 
(सर्वसाधारण) (28015572), (कार्यक्रम) 33 अर्थसहाय्य” या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा व तो सन 2021-
22 या वित्तीय वर्षासाठी मंजूर असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा. 
3. समायोजनाने वितरीत करावयाची रक्कम रु.2927.74 कोटी (रुपये दोन हजार नऊशेसत्तावीस
कोटी चौऱ्याहत्तर लाख फक्त) महावितरण कंपनीस रोख न देता पुढे दर्शवल्याप्रमाणे महावितरण कंपनी मर्या., 
यांच्याकडून शासनास येणे असलेल्या रक्कमेपोटी वसूल करण्यात यावी व खाली नमूद केलेल्या 
लेखाशीर्षाखाली समायोजनाव्दारे जमा करण्यात यावी.

शासन निर्णय क्रमांकः बीयुडी-2021/प्र.क.50/ऊर्जा-3
---------------------------------------------------
[अ. क्र. तपशील, रक्कम रुपये,जमा लेखाशिर्ष. 

अ.क्र.1) दवत्तीय वर्ष 2020-21 या वर्षातील विद्युत 
शुल्कापोटी या आदेशान्वये समायोजित 
करावयाची रक्कम (ऑक्टो, 2020 ते डिसेंबर, 2020 पुर्यत:) (1363.773844-
350.00 =1013.773844)

रक्कम -1363,77,38,440/- 

जमा लेखाशिर्ष - 00043 वीजेवरील कर व शुल्क 
101 वीजेचा वापर व विक्रीय 
यावरील कर (01) (01) मुंबई 
विद्युत शुल्क अधिनियम 1958 
खालील जमा रक्कमा 
(000430092)

अ.क्र. 2) वित्तीय वर्ष 2020-21 या वर्षातील विद्युत 
शुल्कापोटी या आदेशान्वये समायोजित 
करावयाची रक्कम (जाने, 2021 ते मार्च,
2021 अंशत:) (1821.43-
1563.966156 =257.46)

रक्कम - 1563,96,61,560/- 

जमा लेखाशिर्ष - 00043 वीजेवरील कर व शुल्क 
101 वीजेचा वापर व दवक्रीय 
यावरील कर (01) (01) मुंबई 
विद्युत शुल्क अधिनियम 1958 
खालील जमा रक्कमा 
(000430092)
 
एकूण 2927,74,00,000/- ]
--------------------------------------------------
4. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखापरीक्षा), महाराष्ट्र-1/2 मुंबई/नागपूर यांनी त्यांच्या 
अखत्यारित व अधिकारात वरील विवरणपत्रानुसार सदर रक्कम रु.2927.74 कोटी (रुपये दोन हजार नऊशे
सत्तावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख फक्त) चे पुस्तकी समायोजन करुन तसे शासनास कळवावे.
5. सदर रक्कमेचे पुस्तकी समायोजन महालेखापाल, मुंबई यांच्या अखत्यारित व अधिकारात करण्यात 
येत असल्याने रु.2927.74 कोटी (रुपये दोन हजार नऊशेसत्तावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख फक्त) सदर 
रकमेचे देयक तयार करण्यात येवू नये. 
६. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना उपरोक्त समायोजनाव्दारे वितरीत करावयाची 
रक्कम ही वित्त विभागाने मंजूर केलेल्या अनुदानाच्या मर्यादेत आहे. 
7. या लेखाशीर्षाखाली निधी वितरीत करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या देयकाच्या अनुषंगाने 
प्रमाणित करण्यात येते की, या लेखाशीर्षाखाली कोणतेही संक्षिप्त देयक प्रलंबित नाही तसेच उपयोगिता 
प्रमाणपत्र प्रलंबित नाही. सदर शासन निर्णय, नियोजन विभागाच्या मान्यतेने व वित्त विभागाचा 
अनौपचारिक संदर्भ क्र. 230/2021/व्यय-16, दिनांक 26.10.2021 अन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित 
करण्यात येत आहे.
8. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संके स्थळावर उपलब्ध 
करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. 202111241759142410 असा आहे. हा आदेश डिजीटल 
स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे. 
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

 ( ना. रा. ढाणे ) 
 अवर सदचव, महाराष्ट्र शासन

Post a Comment

0 Comments