Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी तालुक्याला काळीमा फासनारी घटना,कसबा वाळवे मंडल अधिकारी विशांत भोसले लाच घेताना रंगेहाथ सापडला.

राधानगरी तालुक्याला काळीमा फासनारी घटना,
कसबा वाळवे मंडल अधिकारी विशांत भोसले लाच घेताना रंगेहाथ सापडला.

शेळेवाडी येथे लाचलुचपतविरोधी पथकाची कारवाई       
सुनिल पाटील
संपादक, राधानगरी लाईव्ह

     माजगाव (ता. राधानगरी ) येथील बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी कर्तव्यात कसूर करून चुकीचा पंचनामा केल्या प्रकरणी ठपका ठेवण्यात आलेला कसबा वाळवे( ता.राधानगरी ) येथील वादग्रस्त मंडल अधिकारी विशांत भोसले याला लाचलूचपतविरोधी पथकाने आज मंगळवारी दुपारी लाच घेताना रंगेहाथ पकडले .शेळेवाडी येथे काही वेळापूर्वी घडलेल्या या प्रकरणाचे वृत्त वाऱ्यासारखे संपूर्ण राधानगरी तालुक्यात पसरले आहे .राधानगरी महसूल विभागाच्या वर्तुळात ही बातमी पसरताच अनेक महसुली अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल बंद ठेवले आहेत .विशांत भोसले याने कशासाठी लाच स्वीकारली आणि लाचेची रक्कम किती होती याचा तपशील समजू शकला नाही . 

     विशांत भोसले याने माजगाव अवैध उत्खनन प्रकरणी केलेला चुकीचा पंचनामा आणि यामुळे शासनाचा बुडालेला महसूल किती असेल ?.याचा अद्याप तपशील कळालेला नाही तरी या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच विशांत भोसले लाच घेताना रंगेहाथ सापडल्याने अवैध उत्खनन करणाऱ्यांच्या वर्तुळाचे धाबे दणाणले आहे .

    तालुक्यात अशी घटना घडने निंदनीय आहे, तरी दोशी अधिकाऱ्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे,अशी समाजातून भावना व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments