Ticker

6/recent/ticker-posts

सामान्यांच्या आवाजाला टाळेबंदी; समर्थकाचा दांडगावा,कोल्हापूरात शिवशाही फौंडेशनच्या संस्थापकावर हल्ला.

सामान्यांच्या आवाजाला टाळेबंदी; समर्थकाचा दांडगावा,
कोल्हापूरात शिवशाही फौंडेशनच्या संस्थापकावर हल्ला.
  
संपादक,
राधानगरी लाईव्ह
  
   नवयुगातील नवीन पत्रकारांना मारहाण करुन टाळेबंदीच्या समर्थकाने टाळेबंदीच्या विरोधकावर हल्ला केला. सोमवारी सायंकाळी शहरातील जरगनगर उपनगर परिसरात ही घटना घडली असून एका निर्भीड पत्रकारावरील या भ्याड हल्ल्याचे तिव्र प्रतिसाद उमटण्याची शक्यता आहे. शिवशाही फौंडेशनचे संस्थापक खुद्द पत्रकार सुनिल सामंत यांना धाकदपटशा करुन धक्काबुक्की एका सत्ताधार्‍याच्या बगलबच्चयाने केली असल्याने कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लागण्यापूर्वी सत्ताधारी मंत्र्यांच्या समर्थकाच्या दांडगाईचा आरंभ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात सामंत यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलीसांच्या अधिक चौकशी व तपासाअंती नेमकी वस्तुस्थिती समोर येईल.
   याबाबत दै.जनमत चे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी सुनिल सामंत यांचेकडून मिळालेली माहिती अशी, दि. १० रोजी भ्रमणध्वनी वरील संदेशप्रसारणातील एक चित्रफीतीबाबत सामंत यांनी आपले मत मांडून अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क बजावला होता. हा हक्क बजावताना त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्याबद्दल अथवा सत्ताधारी मंत्र्याबाबत आक्षेपार्ह किंवा अपमानास्पद विधान केले नव्हते. मात्र एका सत्ताधारी मंत्र्याच्या टाळेबंदी समर्थक बगलबच्च्याने अरेरावीवाचक विधानाचे संदेश प्रत्युत्तरादाखल केले. असले छप्पन पत्रकार माझ्या खिशात आहेत वगैरे कटूताप्रधान लिखाणकाम प्रसारित केले. मंत्री महोदयांचा कट्टर समर्थक असल्याचा बडेजाव करुन थेट सामंत याच्यावर हल्ला केला. दरम्यान परिसरअंतर्गत तणावकारक वातावरण झाले व सामंत यांना मारहाणीचा दबक्या आवाजात निषेधाचे प्रतिसाद उमटले.
    स्थानीक प्रतिष्ठित मंडळींच्या मध्यस्तीने वातावरण निवळण्यास मदत झाली. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात सामंत यांनी अमोल बावडेकर याचे विरोधात फिर्याद दिली असून भादविस ३२३, ५०४, ५०६ निसार नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गुरव करीत आहेत.

[अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला]
[कोणतेही मत कोणत्याही पद्धतीने मांडले तर ते कोणाच्यातरी समर्थनार्थ असते किंवा विरोधात असते. आपले मत व्यक्त करण्यासाठीच भारतीय घटनेने सर्वांना दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरच हल्ला झाला मग तो कुणीही केलेला असो. याची चौकशी झालीच पाहिजे असे पडसाद उमटत आहेत. पत्रकारांवरील हल्ला हा तर अत्यंत संवेदनशील विषय असून या प्रकरणी पोलीस, राजकीय मंडळीनी तात्काळ लक्ष घालण्याची गरज आहे.]

 [कोणत्या मंत्र्याचा कट्टर समर्थक"]
मी मंत्र्यांचा कट्टर समर्थक असून तू कसा फिरतोस बघून घेतो अशी धमकी देणारा कोणत्या मंत्र्यांचा बगलबच्चा आहे? मंत्री महोदयांच्याच आदेशानुसार व वरदहस्तामुळे ही व्यक्ती दादागिरी व गुंडगिरीचं वातावरण तयार करतो आहे? पोलीसात तक्रार दिल्यानंतर कायदा हा सर्वांसाठी समान असतो व तसा राबवलापण जातोच याची प्रचिती सामांन्यांना विशेषकरून कोल्हापूरकरांना सबंधित पोलीस अधिकारी करुन देणार? या प्रश्नांची उत्तरे कोल्हापूरकर शोधत आहेत.

Post a Comment

0 Comments