Ticker

6/recent/ticker-posts

*श्री शाहू हाय. ज्युनियर कॉलेजमध्ये सदिच्छा समारंभ संपन्न* *विदयार्थ्यानो आई वडिल, शिक्षकांचा आदर राखा- भूषण लाड*पत्रकार- सुभाष भोसले


        विद्यार्थ्यांनो माणसातील परमेश्वर ओळखा, गोरगरीब, रंजले गांजलेले, निराधार लोकांची सेवा करा. आई-वडील व शिक्षकांचा आदर करा. असा संदेश येथील ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता बारावीच्या सदिच्छा समारंभानिमित्त विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना उडान फाउंडेशनचे अध्यक्ष भूषण लाड यांनी दिला.प्रा व्ही. एल .शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकातून भूषण लाड यांच्या कार्याचा परिचय करून दिला.प्रा .साळवी यांनी विद्यार्थ्यांनो आई-वडिलांचा, गुरुजनांचा, समाजसेवकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिका. असा मोलाचा संदेश दिला. उपप्राचार्य बी. के. मडीवाळ यांनी विद्यार्थ्यांना 'शाहू ब्रँड' आहे तो तसाच राहू द्या त्याला साजेशे असे वर्तन करा असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. प्राचार्य जे .डी .पाटील यांनीही विद्यार्थ्यांना आईवडिलांची जाणीव ठेवून शिका असे मत व्यक्त करून विद्यार्थांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.बारावी कला शाखेतील विद्यार्थीनी ऎश्वर्या कोळी हिने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य, उपप्राचार्य, वरिष्ठ क्लार्क मानसिंग निंबाळकर , पर्यवेक्षिका सौ एस ए कुलकर्णी ,सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम्. एच. सुतार यांनी केले. प्रा. एल. के. पाटील यांनी आभार मानले. या प्रसंगी बारावीतील सर्व विद्यार्थ्यांना स्नेह भोजनाचे आयोजन काॅलेजच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments