सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील ज्युनिअर काॅलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. प्रमुख पाहुणे रविकिरण नवाळे मुख्याध्यापक कोगनोळी हायस्कूल, कागलचे विद्यमान नगरसेवक नितीन दिंडे, संजय चितारी, मुख्याध्यापक जे. डी. पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे कौन्सिल सदस्य व उपमुख्याध्यापक बाळ डेळेकर तसेच कर्तव्यदक्ष उपप्राचार्य बी. के. मडीवाळ यांच्या हस्ते विविध विषयात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी "विद्यार्थ्यानो ध्येयाने वेडे व्हा, आई-वडीलांची व परिस्थितीची जाणीव ठेवून शिका, पश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करू नका", असा मोलाचा संदेश प्रमुख पाहुणे श्री नवाळे यांनी दिला. या समारंभास शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी जयकुमार देसाईसो, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, युवा नेते, पेट्रन सदस्य दौलत देसाई व प्रशासनाधिकारी डॉ .मंजिरीताई मोरे-देसाई यांचे मोलाचे पाठबळ व मार्गदर्शन लाभले तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे बक्षिसाचे वाचन प्रा.साळवी , प्रा मोरबाळे , प्रा शिंदे यांनी केले.तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. नेताजी गिरी यांनी केले. यावेळी काकासो भोकरे ,प्रविण मोरबाळे शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
0 Comments