*कोल्हापूर* - ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.चंद्रकुमार नलगे यांच्या 'लेखकांची घरे ' या ९४ व्या पुस्तकाचे प्रकाशन वाघबीळ ता.पन्हाळा येथे गरुड भरारीचे मुख्य संपादक अनिल चव्हाण, वाचनकट्टाचे संकल्पक युवराज कदम,शिवाजी विद्यापीठ निरंतर शिक्षण विभाग निवृत्त संचालक डॉ.भालबा विभुते,निवृत्त प्राचार्य डॉ. डी. यु.पवार,निवृत्त कार्यकारी अभियंता डी. वाय.कदम आदी मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाले. सदरच्या पुस्तकांतून डॉ.चंद्रकुमार नलगे यांनी थोर गांधीवादी समाजसुधारक विनोबा भावे,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ग.दि.माडगूळकर, गो. नि.दांडेकर,मधू मंगेश कर्णिक,जयवंत दळवी,आनंद यादव, रा. र.बोराडे,चंद्रकुमार नलगे,महादेव मोरे या लेखकांच्या घराच्या आठवणी या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आल्या आहेत.सदरचे पुस्तक अनिल चव्हाण,युवराज कदम, रवींद्र मोरे, डॉ. भालबा विभुते यांना अर्पण करण्यात आले आहे.
0 Comments