Ticker

6/recent/ticker-posts

*श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कागल मध्ये क्रीडा महोत्सव संपन्न.**विदयार्थ्यानी खेळाडूवृत्ती जोपासावी- उपप्राचार्य बी के मडिवाळ यांचे आवाहन*

*श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कागल मध्ये क्रीडा महोत्सव संपन्न.*
*विदयार्थ्यानी खेळाडूवृत्ती जोपासावी- उपप्राचार्य बी के मडिवाळ यांचे आवाहन*

पत्रकार- सुभाष भोसले

श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कागल येथे दिनांक ३ व ४ डिसेंबर रोजी "वार्षिक क्रीडा महोत्सव २०२२" संपन्न झाला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उपप्राचार्य बी. के. मडिवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा शिक्षक प्रा. प्रविण मोरबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, धावणे, थाळीफेक, गोळाफेक अशा सांघिक व वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महेश शेडबाळे , संदिप मुद्दाण्णा , प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पर्धा घेण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी उपप्राचार्य बी के मडिवाळ यांनी आवाहन केले की, विदयार्थ्यानी खेळाडूवृत्ती जोपासावी सर्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडणेसाठी सहकार्य करावे.

Post a Comment

0 Comments