सावित्रीबाईच्यां कार्यातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी- सौ एस ए फकीर
पत्रकार- सुभाष भोसले
श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेज कागलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला . अध्यक्ष प्राचार्य जे डी पाटील, उपमुख्याध्यापक एल एस डेळेकर, उपप्राचार्य बी के मडिवाळ, पर्यवेक्षिका एस ए कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करणेत आले . सर्व शिक्षक- शिक्षकेतर यांनी पुष्पा जंली अर्पण केली . कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक व्ही एस कांबळे, तर कु सिध्दी रजपूत, कु समृध्दी माने, कु नेहा शेडबाळे यांनी सावित्रीबाईच्यां कार्याचा आढावा घेतला . कु सानिया तिप्पे हिने सावित्रीबाईच्या वेशभूषेत स्वगत सादर करून सध्याच्या पिढीकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या .आभार अनुश्री भोसलेने मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन सौ एस . ए . फकीर यांनी केले . त्यांनी सावित्रीबाईच्यां शैक्षणिक सामाजिक कार्याचा आढावा घेतला पूर्वीची सावित्री व आधुनिक सावित्रीला समाजाकडून दिली जात असलेल्या वागणूकीबद्दल सर्वानी विचार केला पाहिजे याबद्दल जाणीवपूर्वक उल्लेख केला तसेच सावित्रीबाईच्या कार्यातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे विचार व्यक्त केले .
0 Comments