कोल्हापूर: यशवंतराव चव्हाण (के एम सी) कॉलेज कोल्हापूर येथे आज 14 जानेवारी भूगोल दिनानिमित्त भू पर्यावरण कॅलेंडरची उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ अरुण पौडमल यांच्या हस्ते करण्यात आले. भूगोल विभाग प्रमुख डॉ. जे एम शिवणकर यांनी या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. युवराज मोटे यांनी केले तर आभार प्रा. संतोष झित्रे यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयाचे ग्रंथपाल रविद्र मांगले, डाॅ. प्रशांत नागावकर, डाॅ. संजय कांबळे, डाॅ. पी डी तोरस्कर, प्रा. एस. एम. शेख, प्रा. किरण भोसले, प्रा. सचिन धुर्वे, डाॅ. बी. एम. पाटील, प्रा. अनिल मुढे व प्राध्यापक उपस्थित होते.
0 Comments