Ticker

6/recent/ticker-posts

माहिती अधिकार कार्यकर्ता यांच्या प्रयत्नातून यश कागल हळदी गावातील नविन वसाहत नागरिकांना मिळाले पाणी

२५ वर्षे पाणी टंचाईची समस्या अखेर संपली; हळदी ता.कागल येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी.


मागील अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या हळदी ता.कागल येथील २५ वर्षे प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी. यामुळे हळदी रहिवाशांची पाणीटंचाईतून सुटका झाली आहे. याकामी राष्ट्रीय विश्वगामी माहिती अधिकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक उत्तम व्हरांबळे व कागल तालुका अध्यक्ष मारुती वाडकर यांनी पाठपुरावा केला होता.

 गावातील वाढती लोकसंख्या व वसाहतीमुळे येथील जवळपास १०० ते १५० घरांना पिण्याच्या पाण्याची चणचण भासत होती. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी शेजारील शेतामध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अखेर ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोग निधीतून काम सुरू करण्यात आले असून मुबलक पाणीसाठा उपलब्ध करण्यात येईल असे उत्तम व्हरांबळे यांनी सांगितले.तसेच जन सेवार्थ फाऊंडेशन संचलित माहिती अधिकार कार्यकर्ता समिती तसेच राष्ट्रीय विश्वगामी माहिती अधिकार संघ यांच्या प्रयत्नातून हळदी येथील 25 वर्ष प्रलंबित असलेला पिण्याचा पाण्याचा प्रश्न आज मार्गी लागला.गेले अनेक दिवस मी जन सेवार्थ फाऊंडेशन संचलित माहिती अधिकार कागल तालुका अध्यक्ष व राष्ट्रीय विश्वगामी माहिती अधिकार संघ पश्चिम महाराष्ट्र संघटक उत्तम व्हरांबळे.तसेच राष्ट्रीय विश्वगामी माहिती अधिकार कागल तालुका अध्यक्ष मारुती वाडकर त्यांच्या प्रयत्न चालू होता ते काम चालू जाले त्यासाठी आमचे मार्गदर्शक राज्य सल्लागार मा. शफिक तांबोळी व अशोक जुग्दार यांची खूप मदत झाली त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन दिले आणि 25 वर्ष प्रलंबित असलेला पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला.त्यासाठी अनेक लोकांची साथ भेटली आमचे मित्र तसेच मार्गदर्शक माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य सदस्य अशोक जुगदार तसेच राधानगरी येथील माहिती अधिकार कार्यकर्ता समिती कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष तसेच राष्ट्रीय विश्वगामी माहिती अधिकार संघ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अतुल पाटील . राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पत्रकार सुनिल पाटील सर राष्ट्रीय विश्वगामी माहिती अधिकार संघ कोल्हापूर जिल्हा संघटक निलेश चौगले यांनी सहकार्य केले.तसेच आमच्या गावचे आमचे सहकारी सागर सुतार. चतूर व्हणाले.युवराज मगदूम त्यांचे साथ मिळाली
    दरम्यान, आप्पासो कुणकेकर यांच्या हस्ते पूजन करून खोदकाम सुरू करण्यात आले. यावेळी उपसरपंच बाबासो पटेल,उत्तम व्हरांबळे, मारुती वाडकर,सदस्य महादेव मगदूम,कृष्णात मगदूम, सुनिल गोरूले, यासिन पटेल, सागर सुतार, दिपक कुंभार, शिवाजी मोरे.ई.उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments