दक्षिण शिवाजी नगर प्रभाग क्रमांक 17 येथे नवीन वर्षानिमित्त वृक्षारोपण..
प्रमोद चिनके
सांगली.
9405555557
सांगली,दि. १/१/२०२२
दक्षिण शिवाजीनगर सांगली प्रभाग क्रमांक 17 शिवसेना जनसंपर्क कार्यालय समोर माझी वसुंधरा.. या अभियानाअंतर्गत नवीन वर्षानिमित्त पाच झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले..
या पाचही झाडांची संगोपन करण्याची व या सर्व रोपांना पाणी घालून त्याची निगा राखण्याची व त्यातील कोणतीही एक झाड खराब झाल्यास स्वखर्चाने तिथे दुसरे झाड आणून लावून संगोपन करण्याची जबाबदारी शिवसेनेचे उपसरपंच व महाराष्ट्र कामगार सेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष भगवानदास केंगार यांनी घेतलेली आहे..
नवीन वर्षानिमित्त वृक्ष रोपणाचा हा कार्यक्रम पुढे वर्षभर चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.. व प्रभागात अशा अनेक ठिकाणी वृक्षारोपण करणार आहे..
यावेळी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त मा. खरात साहेब. शिवसेना महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार. महाराष्ट्र कामगार सेनेचे मिरज तालुका अध्यक्ष गणेश पाटील. प्रभाग क्रमांक 17 चे Si राजेंद्र गोंधळे. मुकादम सुरज मद्राशी. मनपा कर्मचारी अजय हाताळे. यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते..
0 Comments