Ticker

6/recent/ticker-posts

* *लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने संत रोहीदास महाराज पुण्यतिथी साजरी*

*लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने संत रोहिदास महाराज पुण्यतिथी साजरी.* *
पत्रकार- सुभाष भोसले
 : चर्मकार समाजाचे दैवत संत रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने साजरी करण्यात आली. पक्षाच्या सानेगुरुजी वसाहत येथील कार्यालयात माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांचे हस्ते संत रोहिदासांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना लोकराज्य जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी संत रोहिदास यांचे समता प्रस्थापित करणारे थोर विचार व संतवचनातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन केले. यावेळी लोकराज्य जनता पार्टीचे कोल्हापूर शहर सरचिटणीस हिंदुराव पोवार,शहर संघटक शशिकांत जाधव,हातकणंगले तालुका सरचिटणीस किशोर सातपुते,सुधाकर डोनोलिकर,विलास भिंगे, विजय पोवार ,अशोक तोरसे,विश्वनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.आभार निवास डोईफोडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments