Ticker

6/recent/ticker-posts

श्री शाहू हायस्कूल, ज्यूनिअर कॉलेज कागल येथे समुपदेशन कार्यक्रम संपन्न

श्री शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कागल समुपदेशन कार्यक्रम संपन्न. 
पत्रकार- सुभाष भोसले
श्री शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कागल येथे सोमवार दि. 30/11/2021 रोजी मुलींच्या साठी समुपदेशन कार्यक्रम संपन्न झाला .जेष्ठ प्राध्यापिका सॏ.प्रा.एस. एस. पाटील यांनी किशोरवयीन मुलींच्या आरोग्य व इतर दैनंदिन समस्या व उपाय या विषयावर सर्वकष मार्गदर्शन केले .अनुभवी प्रा. व्ही. एल. शिंदे यांनी "पापा की शेरनी हु में" अशी सुंदर संकल्पना दिली सॏ. प्रा. कुडतरकर यांनी मुलींना advance technology चा वापर अभ्यासासाठी करावा असे आवाहन केले सॏ.प्रा.सुतार किशोरवयीन मुलींसाठी शारीरिक व मानसिक बदल .याविषयी सखोल मार्गदर्शन केले. सर्वच महिला प्राध्यापिकांनी मुलींच्या शंका व प्रश्नांचे निरसन केले.
या कार्यक्रमाला प्राचार्य जे डी पाटील , उपप्राचार्य बी .के.मडिवाळ यांनी प्रोत्साहन दिले .

Post a Comment

0 Comments