Ticker

6/recent/ticker-posts

**बारामती शहरातील भंडारे हॉस्पिटल ते समर्थ नगर पर्यंतचा खोदलेला रस्ता लवकरात लवकर नीट करावा -युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य**

**बारामती शहरातील भंडारे हॉस्पिटल ते समर्थ नगर पर्यंतचा खोदलेला रस्ता लवकरात लवकर नीट करावा -युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य**



बारामती शहरातील भंडारे हॉस्पिटल ते समर्थ नगर पर्यंतचा रस्ता पिण्याचे पाणी , पावसाचे पाणी , पाईपलाईन टाकण्याकरिता , लाईट काम करण्यासाठी व अन्य कामांकरिता त्या - त्या विभागाच्या कॉन्ट्रॅक्टरदारांनी रस्ता खोदला आहे व खोदला जात आहे . परंतु काम पूर्ण झाल्याबरोबर नगरपालिकेच्या नियमानुसार तो रस्ता बुजवला नाही . तसेच बुजवण्याची दक्षता घेतली नाही .भंडारे हॉस्पिटल ते समर्थ नगर हा रस्ता अनेक विविध कामांसाठी त्या - त्या विभागाच्या कॉन्ट्रॅक्टदारांनी खोदलेले रस्ते व खड्डे योग्य प्रकारे न बुजवल्याने - पॅचवर्क न केल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . वाहतुकीच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे धोकादायक आहे . पावसात या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही . त्यामुळे तेथे सतत छोटे - मोठे अपघात होतात . त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो किंवा एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यास सर्वस्वी ते कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असतील .
      तसेच वरील विषयावर वेळीच त्वरीत योग्य व आवश्यक त्या उपाययोजना करण्याची दक्षता घ्यावी . संबंधित कॉन्ट्रॅक्टरदारांना सूचना दाव्यात . तसेच वरील बाबतीसाठी त्या कॉन्ट्रॅक्टरांवर योग्य ती कार्यवाही , उपाययोजना तसेच त्या कॉन्ट्रॅक्टरदारांचे लायसन्स आठ दिवसात रद्द करण्यात यावे . रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी . यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी नगरपरिषद बारामती यांना श्री. स्वप्निल हनुमंत थोरात पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने निवेदन देण्यात आले . निवेदन देतेवेळी सौ.रेखा शिवाजी चौधर पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष , राहुल परशुराम भोसले बारामती तालुकाध्यक्ष , श्री.संदिप विठोबा साळुंखे बारामती तालुका उपाध्यक्ष , सौ.वर्षा रामहरी जाधव बारामती तालुका महिलाध्यक्ष हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments