Ticker

6/recent/ticker-posts

श्री शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कागलमार्फत कागल तहसिलदार कार्यालयास निवेदन*


    पत्रकार- सुभाष भोसले
एस.टी.वाहतूक सुरू करणेविषयी श्री शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने कागल नायब तहसिलदार रूपाली सूर्यवंशी-बरगे यांना निवेदन देणेत आले .एस.टी.कामगारांच्या संपामुळे सर्व बसेसची वाहतूक बंद असलेने परगावावरून अनेक विद्यार्थी कॉलेजला येऊ शकत नाहीत.त्यामुळे काही विदयार्थी खाजगी वाहतुकीचा पर्याय निवडतात.त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसतो.तसेच सुरक्षितता मिळत नाही.तसेच खाजगी वाहतूकदार अवाजवी आकारणी करतात व मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी भरतात.त्यामुळे जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
      तरी आपल्या स्तरावरून एस.टी.वाहतूक सुरू करण्यासंबंधी प्रयत्न करावे.यासाठी शुक्रवार दि.१७ डिसेंबर २०२१ निवेदन देणेत आले
     तरी वरील मागणीनुसार एस.टी.वाहतूक लवकरात लवकर सुरू करनेत यावी ही विनंती. अशी मागणी श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेजचे उपप्राचार्य बी.के. मडिवाळ, एम. बी .घोरपडे, बी एन .शिदें, के .आय. जमादार, बी. बी.हळीज्वाळे, प्रा ए जी घोरपडे, प्रा. एस के काटे, प्रा.एम बी पाटील, प्रा. बी एम साळवी, प्रा. एन एन गिरी, प्रा. एम एच सुतार, प्रा .आर एस पाटणे, प्रा सौ. एन सी सोनवणे, प्रा. व्ही एल शिंदे, महेश शेडबाळे, पी एस जाधव, प्रा. एस एस पाटील, प्रा. एल के पाटील यांनी निवेदनाद्वारे केली .

Post a Comment

0 Comments