आज रोजी मा.गटविकास अधिकारी सॊ पंचायत समिती बारामती यांना युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या वतीने मौजे काऱ्हाटी येथील वेताळ देवस्थानच्या सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण काढण्याबाबत व सार्वजनिक जागेचे रक्षण करणेबाबत तसेच सदर अतिक्रमण धारकांना पाठीशी घालणाऱ्या व त्यांना अतिक्रमण करण्यास साथ देणाऱ्या व हेतुपरस्पर टाळाटाळ करून सतत दिशाभुल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व मा.गटविकास अधिकारी सॊ पंचायत समिती बारामती यांच्या सारख्या वरीष्ठ अधिकारी यांच्या आदेशाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून टाळाटाळ करणाऱ्या व शासकीय कर्तव्य पार पाडताना विलंब करणाऱ्या मा.ग्रामसेवक यांच्यावर
१)शासन परिपत्रक क्र. संकीर्ण२०१३/प्र. क्र.८/१८(र.व.क)
२)शासन परिपत्रक क्र. संकीर्ण१०१०/प्र. क्र.१२६/२०१०/१८(र.व.क) नुसार
शिस्तभंगाची कार्यवाही करणेबाबत अन्यथा युवासंग्राम प्रतिष्ठानच्या वतीने मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती बारामती यांच्या कार्यलयासमोर तीव्र स्वरूपाचे दि:-२०/१२/२०२१ रोजी आंदोलन करणेबाबत निवेदन देण्यात आले.
सदरच्या आंदोलनावेळी कोणतीही वित्त किंवा जीवित हानी झाल्यास त्यास सर्वस्वी मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती , मा.सरपंच/मा.ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन मध्ये नमूद करण्यात आले.अशाप्रकारे श्री. स्वप्निल हनुमंत थोरात पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने निवेदन देण्यात आले ,सदर निवेदन देतेवेळी श्री.संदीप साळुंखे बारामती तालुका उपाध्यक्ष हे उपस्थित होते.
0 Comments