Ticker

6/recent/ticker-posts

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे लाक्षणिक उपोषण आंदोलन*


पत्रकार- सुभाष भोसले
कोल्हापूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहेत.या शिक्षकांना वर्षानुवर्षे उपाशीपोटी काम करावे लागत आहे.वेळोवेळी आंदोलने करून देखील या प्रश्नांचा निपटारा होताना दिसत नाही.त्यामुळे गुरुवार दि.१६ डिसेंबर रोजी शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले . या आदोलंनाला शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी पाठिंबा दिला .
   मूल्यांकन पात्र घोषित अघोषित विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान देणे,व्यपगत पदे पुनर्जीवित करणे,आय टी विषय शिक्षकांना वेतन देणे,वाढीव पदांना मान्यता देणे,सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन देणे,वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी ऑनलाइन प्रशिक्षण शुल्क रद्द करणे, अर्धवेळ शिक्षकानां सेवा सरक्षण देणे, मान्यता मिळालेल्या सर्व शिक्षकांना शालार्थ आय डी देणे , पवित्र पोर्टल रद्द करून प्रचलित पध्दतीनुसार शिक्षकांच्या नेमणूकीस परवानगी दयावी .आदी प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला संघटनेचे अध्यक्ष प्रा . टी एस दुर्गी, सचिव प्रा.संजय मोरे ,प्रा . तुकाराम सरगर ,प्रा . डी बी गायकर ,प्रा .अमर शेळके,प्रा .एन बी बुराण, प्रा . रामचंद्र गावडे, प्रा . संदिप सावगावे, प्रा . शिवाजीराव होडगे, प्रा .एम के परीट,प्रा . बी के मडिवाळ, प्रा . नारायण राणे,प्रा . अनिता पाटील ,प्रा .अनिल कुमार पाटील, प्रा .उदय आतकीरे, प्रा . अरविंद सावंत, प्रा . नामदेव चोपडे, प्रा .नितीन पोतदार ,प्रा . शशिकांत खोराटे, प्रा . अमित रेडेकर ,प्रा .विकास माने, प्रा . अरविंद पाटील, प्रा . विकास माने, प्रा . अरविंद पाटील, प्रा .कुंडलिक जाधव ,प्रा .चंद्रशेखर कांबळे ,प्रा . अमर चव्हाण ,प्रा .संध्या नागन्नावर,प्रा .विद्या मोरे, काकासाहेब भोकरे व जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या पत्रकाद्वारे देणेत आला आहे.

Post a Comment

0 Comments