सांगली.
९४०५५५५५५७
नागरिकाना हे केंदाळ फुल झाडे सुरत वरुन आणली आहेत असे सांगून 50 रूपयेला एक आणि 100 रुपयास 3 या प्रमाणे विक्री होत आहे.सांगली मध्ये आकाशवानी केंद्र,विजय नगर मिरज रोड येथे ही विक्री सुरु आहे.
पर्यावरण प्रेमी,वृक्ष मित्र भास्कर शिंदे यानी फसवणूकीचा हा प्रकार उघडकीस आणला असून.
संबंधीत महिलाना पोलीस ठाणे येथे केंदाळ सहीत आणले आहे.
एकीकडे प्रशासन आणि पर्यावरण प्रेमी पर्यावरण दूषित होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे हेच प्रशासन केंदाळ विक्री करणा-या व्यवसाईकाकडे दुर्लक्ष करत आहे.
या प्रकारामुळे नागरीकांची फसवणूक होत आहेच त्याच बरोबर पर्यावरण प्रदूषित होत आहे.सांगली आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
केंदाळ मुक्त करण्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करत असताना असे उद्योग राजरोस सुरु आहेत.
0 Comments