पत्रकार- सुभाष भोसले
कोल्हापूर जिल्हा विभागीय 18 वर्षाखालील मुले व मुलींच्या संघाची निवड चाचणी स्पर्धा श्री शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेज कागल येथे मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली . सदर स्पर्धेदरम्यान कोल्हापूर विभागाचे सचिव श्री नीलेश चमणकर यांचा सत्कार श्री शाहू हायस्कूल ,ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य जे.डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कोल्हापूर विभागीय सचिव श्री संदीप पाटील व भारतीय महासंघाचे सचिव प्रा . बाळासाहेब सुरोशे यांचा महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल संघटनेचे उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री शाहू हायस्कूल ज्यूनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री बी. के .मडिवाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . सदरच्या निवड चाचणी मधून निवड होणारा संघ वरोरा, चंद्रपूर येथे राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये दिनांक अठरा ते वीस तारखे दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे .
कोल्हापूर जिल्हा विभागीय निवड चाचणी स्पर्धा संयोजक श्री महेश शेडबाळे,श्री प्रवीण मोरबाळे, अभिषेक भुरले ,शैलेश प्रसाद, संग्राम तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू हायस्कूल , ज्यूनिअर कॉलेज कागलच्या क्रिंडागणावर उत्साहात संपन्न झाली . यावेळी पर्यवेक्षिका सौ एस ए कुलकर्णी, महादेव
कानकेकर , रमेश कांबळे, मानसी जमादार, भालचंद्र आजरेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
0 Comments