Ticker

6/recent/ticker-posts

कुरूंदवाड-दि.24डिसेंबर...गांधीतीर्थ कुरूंदवाड येथे *प्रतिज्ञा* पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

कुरूंदवाड-दि.24डिसेंबर...गांधीतीर्थ कुरूंदवाड येथे *प्रतिज्ञा* पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
पूज्य सानेगुरूजी जयंती व राष्ट्रसेवादलाचे पहिले अध्यक्ष यदुनाथ थत्ते यांच्या जन्मशताब्दिचे औचित्त्य साधून येथील सानेगुरूजी शिक्षण संस्था व महात्मा गांधी अध्ययन केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने यदुनाथ थत्ते लिखित प्रतिज्ञा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा...राष्ट्रसेवादलाच खंदेे युवा कार्यकर्ते, प्रमुख अतिथी मा. संजय रेंदाळकर,मुख्याध्यापक मालतीबाई माने विद्यालय लेखक व कवी इचलकरंजी यांचे हस्ते गांधीतीर्थ - साने गुरूजी विद्यालयाच्या प्रांगणात शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सानेगुरूजी शिक्षण संस्थेचे सचिव मा.अजित पाटील हे होते तर महात्मा गांधी अध्ययन केंद्र व द्न्यानेश्वर मुळे फौंडेशन चे नूतन सचिव ,साहित्यिक कवी प्रा. दिलीप सुतार तसेच विद्यालयाचे संचालक राजेंद्र मालगांवे व न्यू इंग्लिश स्कूल फाँर गर्ल्स च्या मुख्याध्यापिका सौ यादव मँडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख अतिथी रेंदाळकर व उपस्थितांच्या हस्ते साने गुरूजींच्या प्रतिमेचे पूजन करणेत आले. *रेंदाळकर म्हणाले"यदुनाथ जी हे सानेगुरूजींचे अतिशय लाडके शिष्य होते...त्यांचे हे पुस्तक प्रत्येक शिक्षक पालकाने सवड काढून वाचले पाहिजे...शिक्षणाबद्दलआस्था असणा-या सर्वानी व मानवतेवर प्रेम करणा-या सर्वांच्या घरी हे पुस्तक असले पाहिजे..."*

 स्वागत व प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रोहिणी निर्मळे यानी केले.

*याप्रसंगी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. चांदणी पटेल हिची भारतीय रिझर्व बँक -सेवेत ...बांद्रा मुंबई शाखेत,अभिनंदनीय निवड झालेबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्म्रुतीचिन्ह व पुप्षगुच्छ देऊन सत्कार करणेत आला.*

Post a Comment

0 Comments