*कोल्हापूर* : थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पक्षाच्या सानेगुरुजी वसाहत येथील कार्यालयात प्रमुख पाहुणे राजेंद्र यादव यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक लोकराज्य जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ मार्गदर्शक पी.के. पाटील, पक्षाचे कोल्हापूर शहर सरचिटणीस हिंदुराव पोवार, अशोक तोरसे, शहर संघटक शशिकांत जाधव, सर्जेराव भोसले, कोल्हापूर दक्षिण सरचिटणीस देवेंद्र पटेकरी, अशोक चव्हाण, गोरक्ष पाटील, अशोक पाटील,अशोकराव माळी, अभिजीत पाटील, वसंतराव पाटील, सुनील कुंभार, सुरेश पाटील, मनोहर कुराडे,काकासाहेब भोकरे, आनंदा चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना राजेंद्र यादव म्हणाले, *'मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून दिले. सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.महात्मा फुलेंचे विचार व महान कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे'* , असे प्रतिपादन राजेंद्र यादव यांनी केले. यावेळी अनिल चव्हाण लिखित 'युगपुरूष : महात्मा फुले' या पुस्तकाच्या प्रती उपस्थित सर्वांना वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी गोरक्ष बाजीराव पाटील यांची पन्हाळा तालुका उपाध्यक्षपदी निवड करून त्यांना निवडीचे पत्र लोकराज्य जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले.आभार देवेंद्र पटेकरी यांनी मानले.
0 Comments