कोल्हापूर:* गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळ कर्मचार्यांच्या संपास लोकराज्य जनता पार्टीने जाहीर पाठिंबा देऊन राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्याची मागणी केली. लोकराज्य जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी संभाजीनगर एस.टी.आगार येथे संपात सहभागी कर्मचाऱ्यांची भेट देऊन पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी लोकराज्य जनता पार्टीचे कोल्हापूर शहर सरचिटणीस हिंदुराव पोवार, विजय केसरकर, विष्णू चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे, बाळकृष्ण गवळी, संघटक संतोष बिसुरे, सरचिटणीस शशिकांत जाधव, अशोक तोरसे आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एस.टी. कर्मचारी प्रतिनिधी सुधीर कांदेकर, सुभाष सुतार ,धनाजी पाटील, बाळासाहेब कांबळे, प्रकाश माळी व मोठ्या संख्येने महिला व पुरुष एस.टी. कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना लोकराज्य जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी ,*'एस.टी. कर्मचाऱ्यांच्या लढ्याचे व संघर्षाचे कौतुक केले. पूरग्रस्त काळात व कोरोना प्रादुर्भाव काळात एस.टी. कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याचे मोठे कार्य केले आहे . अन्य कोणत्याही शासनाच्या विभागापेक्षा एस.टी.चा कर्मचारी जोखीम घेऊन प्रवाशांना सुखरुप घेऊन जाण्याचे काम करीत असतो. म्हणूनच राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनाकडे विलीनीकरण करून एस.टी. कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व आर्थिक लाभ मिळाले पाहिजेत,* अशी मागणी केली. एस.टी. कामगार प्रतिनिधी बाळासाहेब कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.
0 Comments