Ticker

6/recent/ticker-posts

लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा* पत्रकार- सुभाष भोसले

*
*कोल्हापूर*: लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने 'संविधान दिन' विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पक्षाच्या सानेगुरुजी वसाहत येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विलासराव चव्हाण यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व संविधान उद्देशिका प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी लोकराज्य जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन उपस्थित सर्वांनी केले. कार्यक्रमास लोकराज्य जनता पार्टीचे शहर संघटक शशिकांत जाधव, अशोक चव्हाण, सौ.जयश्री चव्हाण, जुलेखा केणी,देवेंद्र पटेकरी, जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे,, विजय केसरकर, अशोक तोरसे, सुरेश जाधव, संतोष बीसुरे,सर्जेराव भोसले,बाळकृष्ण गवळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments