*श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर येथे मा.शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांचे हस्ते विविध उपक्रमाचे उद्धाटन*
पत्रकार- सुभाष भोसले
कागल तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणजे निकम विद्यालय होय असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले.व्हन्नूर ता.कागल येथील श्री.दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर या प्रशालेमध्ये आयोजित गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा श्रीमती सुनंदा निकम होत्या.
ते पुढे म्हणाले,विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षकांनी आपणच पालक आहोत अशा भावनेने काम केल्याने कागल तालुक्यात निकम विद्यालय अग्रेसर आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ गुणांची गरज नसते तर सकारात्मक विचारशैली आणि सदाचार या गुणांची जास्त आवश्यकता असल्याचे प्रतिपादनही आंबोकर यांनी केले.
या गुणगौरव समारंभामध्ये कागल तालुक्यातील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक,प्रशालेतील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक,SSC गुणवंत विद्यार्थी,NMMS शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी,वक्तृत्व व निबंध स्पर्धा,स्काऊट गाईड पुरस्कार प्राप्त यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थी दत्तक योजने अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना श्री आंबोकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.तसेच प्रशालेच्या ब्लॉगचे व कोरोना एक महामारी या विषयावरील भित्तीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक संघाचे व्हा.चेअरमन बाबासो बुगडे,कागल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.टी चौगुले व महालक्ष्मी हायस्कूल सावर्डे बुद्रुकच्या प्राचार्या प्रभावती पाटील यांनी आपली मते व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे सेक्रेटरी यशवंतराव निकम,संचालक आप्पासाहेब देसाई,पी.व्ही.पाटील,एस.आर. पाटील,एम.आय.कांबळे,शाकीर मुजावर,अनिल खामकर,संगीता हिरुगडे,जी.के.भोसले,तानाजी पाटील,प्रशालेच्या माता पालक व शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांनी केले पाहुण्यांचा परिचय एन.सी यादव, ब्लॉग ची माहिती एस.के.तिकोडे यांनी दिली,सूत्रसंचालन एम.जी.मोरे यांनी केले तर आभार बी.बी.खाडे यांनी मानले.
0 Comments