राज्याच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढून राज्यातील शिक्षकांचे सेवांतर्गत होणारे १२ वर्षानंतरचे वरिष्ठ वेतन श्रेणी व २४ वर्षांनंतरचे निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण साठी २००० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. यापूर्वी शासनाच्या कोणत्याही प्रशिक्षणास शुल्क आकारण्यात आलेले नव्हते. वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने घेण्यात येत असते.यापूर्वी अशा कोणत्याच प्रशिक्षणास शुल्क आकारण्यात आले नव्हते .शासनाने शुल्क आकारणी संदर्भात घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असून तो अन्यायकारक आहे. शासनाने शुल्काबाबतचा हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा राज्यातील शिक्षकांच्या रोषाला शासनाला सामोरे जावे लागेल असा इशारा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने देण्यात आला. शिक्षक भारती पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखाली सदरचे निवेदन देण्यात आले. कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात लेखाधिकारी अस्मिता मोटे यांच्याकडे याबाबतचे निवेदन शिक्षक भारतीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष काकासाहेब भोकरे,कार्याध्यक्ष बाळ डेळेकर, जिल्हा सचिव अनिल चव्हाण,संजय डवर, बी.के.मडीवाळ, मांडरेकर सर व शिक्षक भारती पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
0 Comments