Ticker

6/recent/ticker-posts

*लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन साजरा.*


 कोल्हापूर*: महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने साजरा करण्यात आला.पक्षाच्या सानेगुरुजी वसाहत येथील कार्यालयात लोकराज्य जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे कोल्हापूर शहर सरचिटणीस अशोक तोरसे, बाळासाहेब खोत, शिवाजी खोत, जयश्री चव्हाण व वनिता वडेर,जुलेखा केनी, शशिकांत जाधव,अमोल कांबळे, विजय केसरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना अनिल चव्हाण यांनी थोर नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला .*'यशवंतरावजी चव्हाण यांनी विद्यार्थीदशेत असतानाच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता.देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राजकीय जीवनात त्यांनी अनेक पदे भूषवली.१९६१ मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली व पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. देशाचे संरक्षणमंत्री,अर्थमंत्री, गृहमंत्री अशी अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सक्षमपणे सांभाळली. महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजविण्यात यशवंतराव चव्हाण यांचे खूप मोठे योगदान आहे,* असे प्रतिपादन अनिल चव्हाण यांनी केले.कार्यक्रमाचे आभार अशोक तोरसे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments