Ticker

6/recent/ticker-posts

धामोड ग्रामस्थांची मागणी, हनुमान मंदिरा ची डागडुजी करा अन्यथा टाळे ठोकू.

दि.५/१०/२१
धामोड ता.राधानगरी येतील गावातील दैवत हनुमान मंदिर याची या वर्षी नवरात्र उत्सव चे अवचित साधून  डागडुजी व रंगरंगोटी करण्यात यावी यासाठी गावातील लोकाकडून  देवस्थान (गाव ) समितीकडे व ग्रामपंचायतीकडे लेखी अर्जाद्वारे मागणी करण्यात आली असून अर्जाची दखल न घेतल्यास गावातील हनुमान मंदिरला टाळे ठोकण्यात असे म्हणले आहे.
तरी या संदर्भात गावातील सरपंच व देवस्थान समितीचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला असता आपण हॉस्पिटलमध्ये असून कमिटी सचिव यांच्याशी बोलणे झाले आहे .तरी उपलब्ध रकमेतून मंदिराची रंगरंगोटी करण्यात येईल असे म्हटले आहे देवस्थान समितीकडे शिल्लक रक्कम अंदाजे पन्नास हजार असून त्यामध्ये जितके डागडुजीचे काम होईल ते करून घेण्यात येईल असे त्यांच्याकडून कळवण्यात आले  आहे.
अर्जावर गावातील बबलू नलवडे ,संदीप नलवडे, सागर खोत बबन पाटील, विठ्ठल पाटील, अक्षय पाणारी, रवी नलवडे, निशांत नलवडे युवराज, नलवडे ,विजय नलवडे, स्वप्निल आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments