शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित श्री शाहू हायस्कूल, ज्यूनि कॉलेजचे ज्येष्ठ शिक्षक , शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब भोकरे यांना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रम चा नेशन बिल्डर अॅवार्ड प्राप्त झाले बद्दल शाहू परीवारामार्फत हार्दिक अभिनंदन. मा शंकर यादव, मा करूणाकर नायक, यांच्या प्रमुख उपस्थितीत या वर्षीचा प्रतिष्ठेचा हा पुरस्कार त्यांना प्रदान करनेत आला काकासाहेब भोकरे यांनी 26 वर्षाच्या कालावधीत केलेल्या शैक्षणिक व संघटनात्मक कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार रोटरी समाज सेवा केंद्र हॉल,नागाळा पार्क कोल्हापूर येथे देणेत आला . यावेळी स्नेहा राणी भोकरे , सौरभ भोकरे उपस्थित होते .या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरामधून अभिनंदन होत आहे .
यावेळी ते म्हणाले की, संस्थेचे सेक्रेटरी जयकुमार देसाईसो, युवा नेते दौलतराव देसाई सो, प्रशासनधिकारी डॉ मंजिरी मोरे -देसाई , उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, शिक्षक नेते दादासाहेब लाड, कोजिमाशि चेअरमन बाळ डेळेकर, यांच्या प्रोत्साहनामुळे व प्राचार्य जे डी पाटील, उपप्राचार्य बी के मडिवाळ, पर्यवेक्षिका सौ एस ए कुलकर्णी,एस जी पाटील, एस यु देशमुख यांच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला .
0 Comments