अध्यक्षस्थानी साने गुरूजी शिक्षण संस्थेचे चेअरमन मा रावसाहेब उर्फ दा. आ पाटील व माजी नगराध्यक्ष दादासाो पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलतांनाप्रमुख अतिथी सुनिल स्वामी म्हणाले
"मोहनदास ते महात्मा गांधी आणि मोहात्मा ते महात्मा हा गांधीचा प्रवास सर्वांना अवगत असावा व त्यांचा वैचारिक वारसा सातत्याने चालत रहावा.
या गांधी आचार विचारांशी
आजच्या पिढीला जोडून घेणे गरजेचे आहे म्हणजे गांधीजींचे ...गांधीच करायच काय? तर त्यांच्या आचार विचारांचे अनुकरण करावे म्हणजे ते विद्यार्थ्यांच्या मनांमध्ये उतरले पाहिजेत.
वाचनाच्या पलीकडे जाऊन
चित्रपट नाट्य कथा कविता कादंबरी व सर्व ललित कलांचा तसेच बदलता तंत्रद्न्यानाचा आधार घेऊन समाज प्रबोधनाची वेगवेगळी कल्पक अंगे स्वीकारली तर हे अध्ययन केंद्र अव्याहतपणे विकसित होत राहील व नावारूपास येईल.
आपल्या आतल्या कोंडलेल्या आवाजाला समजून घेणे म्हणजे महात्मा गांधीना आपण समजून घेणे होय.
*प्रत्येकात एक मोहदास दडलेला आहे*
*त्याचे प्रयत्नपूर्वक परिवर्तन महात्मा गांधीमधे होणे आवश्यक आहे...!*
आपल्या वैयक्तिक व समाज जीवनात निर्माण होणा-या प्रत्येक प्रश्नाला भिडण्याची ताकत महात्मा गांधी चरीत्रामध्ये आहे. म्हणून त्याचे जाणीवपूर्वक वाचन चिंतन मंथन आवश्यक आहे"
कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख अतिथीना छात्रसेनेच्या विद्यार्थ्याच्या तर्फे मानवंदनेने....व अध्यापिका सौ धनश्री पोवार यांनी सुरेल पणे गायलेल्या म.गांधी यांच्याआवडत्या रघुपती राघव राजाराम..सबको सन्मती दे भगवान...या भजनाने झाली.
महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख अतिथी मा.सुनिल स्वामी व रावसाहेब उर्फ दा.आ.पाटील यांचे हस्ते तर माजी नगराध्यक्ष मा श्री.दादासाहेब पाटील यांच्या हस्ते अमेरिकेतील जेम्स मँडिसन विद्यापीठातील जागतिक अहिंसा केंद्राचे प्रमुख कालवश डॉ.टेरी डीन बेट्झिल यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले.
तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांना रावसाहेब आलासे यांच्याकडून प्राप्त गणवेश वितरण व एन सी सी च्या पहील्या बॅचच्या विद्यार्थ्यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देणेतआले .
पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापिका निर्मळे रोहीणी यांनी तर प्रास्ताविक जेष्ठ साहित्यिक कवी दिलिप सुतार यांनी केले.
सुत्रसंचालन श्रीमती पन्हाळी नसिमा व निर्मळे संजीवनी यांनी केले तर आभार विजय माळी सर यांनी मानले.
यावेळी साने गुरुजी शिक्षण संस्था उपाध्यक्ष प्रभाकर कनवाडकर, विष्णू लोखंडे ,सचिव अजित पाटील, संचालक राजेंद्र आलासे, निखिल आलासे, राजेंद्र मालगावे महात्मा गांधी जयंती समितीचे सदस्य सच्चिदानंद आवटी राजेंद्र देसाई ,राजेश मडीवाळ, बाबासाहेब भुजुगडे,शरद आलासे,संदिप अडसूळ, नंदकुमार हंबर,शांतगोंडा पाटील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments