Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई लाल बाग या ठिकाणी सेवा बाजवणाऱ्या पोलिस निरीक्षक यांची पत्रकार यांना दमदाटी व चुकीच्या पद्धतीने अरेरावी केल्याबद्दल निषेध व कार्यवाही करण्याची मागणी.

 *युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन*


*युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे जाहीर निषेध*



कोल्हापूर,दि.११-मुंबई येथील लालबागचा राजा गणपती संबंधित वार्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार यांना ओळखपत्र आणि विशेष पास बाळगला असतानाही 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना वृत्तांकनासाठी रोखून ठेवून अरेरावी भाषेचा वापर करणाऱ्या पोलीस निरीक्षकांचा युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे जाहीर निषेध तसेच, पत्रकारांशी उद्धटपणे वागणाऱ्या पोलीस निरीक्षक संजय निकम यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे अशी मागणीही युवा पत्रकार असोसिएशन यांनी लेखी निवेदनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना केली आहे.



यावेळी युवा पत्रकार असो.कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रियाज जैनापुरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष फिरोज खाटीक, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख योगेश कांबळे,सदस्य फरीद शेख,असलम मुजावर,आदम फकीर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments