रविवार दि. 5 सप्टेंबर...भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाक्रुष्णन यांचा जन्मदिन...म्हणजेच बालवाडी ते महाविद्यालयात शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक म्हणून कार्यरत असणा-या सर्व गुरूजनांचा...राष्ट्रीय वाढदिवस...शिक्षकदिन...!!!
*गुरू*
गुरू...एक प्रारंभ
एक शुभमुहूर्त...
बोबड्या बोलीतून...
को-या पाटीवर
धुळाक्षरे गिरविण्याचा...
आईचे बोट धरून...
जग जाणून घेण्याचा...!
गुरू...
एक प्रेमळ समर्थ हात
आपल्या पाठीवरचा
एक द्रुढ आत्मविश्वास...
मन मेंदू मनगटातला..
कुबड्याविना आयुष्याची शर्यत जिकण्याचा...!!
गुरू... एक स्वाध्याय
एक सशक्त परिपाठ...
निरंतर मूल्य शिक्षणाचा...
पशुत्वावर मात करून
केवळ माणूस म्हणून जगण्याचा...!!!
गुरू...
एक साक्षात्कार...
एक गर्भ संस्कार...
आजन्म संघर्ष करण्याचा
अभिमन्यू होऊन...
चक्रव्यूह भेदण्याचा...!!!!
गुरू... एक डोळस जिज्ञासा
मातीचा पुतळा करून
गुरूविना विद्या ग्रहण करण्याची
सर्व पळवाटा टाळून...
'एकलव्य' होण्याची...!!!!!
गुरू...
एक परिपूर्ण आचार विचार
एक चैतन्याचा संचार
मनुष्याला देवत्व प्रदान करणारा
एक परिसस्पर्श...
आपल्या आयुष्याचे सोने करणारा...!!!!!!
*@प्रा.दिलीप सुतार*
*कुरूंदवाड*
*मो. नं 9552916501*
0 Comments