Ticker

6/recent/ticker-posts

व्हन्नूर येथील भाऊसाहेब खाडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान



व्हन्नूर येथील भाऊसाहेब खाडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

दौलतराव निकम
कागल प्रतिनिधी

     व्हन्नूर (ता.कागल) येथील श्री दौलतराव निकम विद्यालयाचे शिक्षक श्री भाऊसाहेब खाडे यांना आंनदगंगा फौंडेशन हातकणंगले कोल्हापूर यांचेकडून या वर्षीचा ( २०२०-२१ ) राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेली २० वर्ष शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. तसेच सामाजिक व सहकार क्षेत्रातही त्यांचे काम आदर्शवत आहे.जिल्हयाचे खासदार धैर्यशील माने (दादा ), जि.प. माजी अर्थ व शिक्षण सभापती प्रविण यादव, गोकळचे संचालक सुजीत मिणचेकर, प्राचार्य संजय घोडावत इंस्टिट्युट विराट गिरी,म.रा.प्रा. शिक्षक संघ राज्याध्यक्ष राजाराम वरुटे. फौंडेशन अध्यक्ष तानाजी पोवार, सलगर चहाचे मालक दादू सलगर, उदयोगपती बापूसाहेब मुसळे व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

          त्यासाठी त्यांना स्वांतत्र्यसेनानी दौलतरावजी निकम यांचे आशीर्वाद व मुख्याध्यापक विलास पोवार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने गावातील विविध संस्था व मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments