२०१९ मधील सरळ सेवा भरतीतील प्रशिक्षित कोल्हापूर मधील २०७ उमेद वारांची अंतिम वाहन चाचणी कधी घेणार?
प्रशिक्षित सांगली १०५ व कोल्हापूर मधील २०७ उमेदवारानी विभाग नियंत्रण परिवहन महामंडळ यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये सन 2019 मध्ये सरळ सेवा भरती तील कोल्हापुरातील २०७ प्रशिक्षित उमेदवार असून मागील दोन वर्षापासून आमचे प्रशिक्षण सुरू होते. सरतेशेवटी आमचे अंतिम वाहन चाचणी (MEO TEST) होऊ शकली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत आम्ही घरी आहोत. व आमच्या हाताला दुसरे काम नाही अशा परिस्थितीत आमच्या कुटुंबाची जबाबदारी संपूर्ण आमच्यावर असून आम्ही बेरोजगार असल्यामुळे आम्ही फार मोठ्या आर्थिक विवंचनेतून जात आहोत. सद्यपरिस्थितीत बससेवा सुरू झाली असून बस रुटींग सुद्धा व्यवस्थित चालू झाले आहे त्यामुळे मे. साहेबांनी आमची वाहन चाचणी घेऊन आम्हाला लवकरात लवकर सेवेत रुजू करून घ्यावे अशी विनंती करण्यात आली आहे सदर निवेदन कॉपी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य, महाव्यवस्थापक महाराष्ट्र परिवहन महामंडळ मुंबई, यांना सादर करण्यात आले आहे.
0 Comments