*वि स खांडेकर प्रशालेत वि.स. तथा भाऊसाहेब खांडेकर यांचा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी संपन्न..*
कोल्हापूर :
ज्ञानपीठ विजेते थोर साहित्यिक व आंतरभारती शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वि. स. खांडेकर यांचा ४५ वा स्मृतिदिन आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित वि. स. खांडेकर प्रशाला, शाहूपुरी येथे विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.याप्रसंगी वि. स. खांडेकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास शालेय समितीचे चेअरमन व आंतरभारती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष माननीय जिनरत्न रोटे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.प्रमुख उपस्थित मुख्याध्यापिका उषादेवी देशमुख,बालक मंदिर मुख्याध्यापिका संजीवनी सावेकर,संतोष आयरे हे होते.मुख्य कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक शिक्षक अनिल चव्हाण यांचे व्याख्यान झाले. वि.स.खांडेकरांचा संपूर्ण जीवनपट त्यांनी आपल्या भाषणाततून मांडला. या व्याख्यानास सुमारे 150 विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. अध्यक्षीय भाषणात जिनरत्न रोटे यांनी वि.स.खांडेकरांची जीवन मूल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत असे आवाहन केले. यावेळी पर्यवेक्षिका सौ. नेहा कानकेकर, पालक संघाचे उपाध्यक्ष प्रशांत गिरी,राजेश वरक यांनीही मनोगते व्यक्त केली.यावेळी पालक संघ अध्यक्षा श्रद्धा पताडे
कु. श्रुती म्हापसेकर,कु आज्ञा शिंदे, कु. गायत्री भोपळे या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून खांडेकर यांचे जीवन व कार्य याबद्दल माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते यावेळी वि. स. खांडेकर यांच्या विचारांवर आधारित बुलेटिनचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आदिती वळगड्डी( इयत्ता १० वी) हिने केले तर आभार कु. सफा मुजावर हिने मानले.. यावेळी वि स खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शाळेत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्याचा निकाल घोषित करण्यात आला. त्याच बरोबर एन. एम. एस. एस. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी तसेच इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश संपादन केलेला विद्यार्थ्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता १० वी "अ" चे वर्गशिक्षक श्री बाबासाहेब डोणेसर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केले होते.
*हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने पाहता यावा अशा पद्धतीची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली होती.*

0 Comments