बहुजन युथ पॅंथर च्या वतीने आ
ज दिनांक २/९/२०२१ रोजी कोल्हापूर विश्राम गृह बावडा या ठिकाणी कामाचा आढावा विशेष बैठक घेण्यात आली.
यावेळी प्रयाग चिखली व अनेक खेड्यातून कोल्हापूर मधून आपल्या समस्या घेऊन महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .त्यावेळेला अनेक समस्यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळेला बैठकीमध्ये महिलांनी सांगितले की यापूर्वीही आम्हाला आपल्या संघटनेने न्याय मिळवून दिलेला आहे. आणि इथून पुढेही आपली संघटना आम्हाला न्याय मिळवून देऊ शकते. याची आम्हाला खात्री आहे .व आपल्या संघटनेमध्ये आम्ही सर्व महिलानां काम करण्याची संधी मिळावी असे सांगितले. या बैठकीच्या वेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विश्वास कांबळे, उपजिल्हाध्यक्ष सागर चव्हाण,, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) मनोहर खोत, संपर्कप्रमुख राजू वायदंडे, बाबुराव जैताळ कर, किरण कांबळे, दयानंद कांबळे, भिकाजी कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा सविता घोडके, उपजिल्हाध्यक्षा भारती पुरेकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments