त्याच रंग रुप छान
त्याच्या गोजि-या मनात
गर्द हिरवं सपान...
आला आला गं श्रावण
स्पर्श हिरवा घेऊन
झाली धरती पावन
चिंब प्रेमात भिजून...
आला आला गं श्रावण
त्याच्या कंठात गांधार...
कोकीळेच्या गाण्यालाही
तोच देई तालसूर...
आला आला गं श्रावण
बाई अवखळ फार...
त्याच्या नादान डोलते
उभं समदं शिवार...
आला आला गं श्रावण
चराचराचे स्पंदन...
सणासुदीचे रांधन
भावभक्तीचे चंदन...
आला आला गं श्रावण
देण्या शब्द वरदान.।.
माझ्या शब्दकळेवर
त्याचं उदंडसे ऋण...
आला आला गं श्रावण
त्याच मायेच गोंदण...
जन्मोजन्मी च्या प्रीतीला
लाभो श्रावणी कोंदण..!!!
@ प्रा.दिलीप सुतार
कुरुंदवाड

0 Comments