Ticker

6/recent/ticker-posts

*येथे झाली बालकांच्या कायद्यांची कार्यशाळा संपन्न*


अवनि संस्था मुलांच्या अधिकारासाठी कार्यरत असून संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्पावर काम सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने अनाथ, निराधार, वंचित बालके, हंगामी स्थलांतरित बालके, बाल भिक्षेकरी, बाल कामगार व कचरा वेचक महिला यांची बालके, तसेच काळजी व संरक्षण अंतर्गत येणारी बालके यांच्यासोबत काम करत असताना कायद्यांची सांगड घालणे गरजेचे असते. यामध्ये कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वाची असून अवनी संस्थेमार्फत दोन दिवसीय अवनी बाल संकुल हणबरवाडी येथे बालकांच्या कायद्याची तोंडओळख या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक अमर कांबळे यांनी मांडले तर सदरील कार्यशाळेचे मार्गदर्शन मा.अतुल देसाई मा.कल्याण समिती सदस्य यांनी केले यामध्ये प्रामुख्याने मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 सदरील कायद्यामध्ये बालकांचे अधिकार बालकांच्या संबंधी यंत्रणा बालकांचे संरक्षण धोरण बालकांच्या सोबत काम करत असताना पोलिसांची भूमिका व बालका संबंधी प्रशासकीय यंत्रणा या बाबत माहिती देण्यात आली. त्याच प्रमाणे लैंगिक अपराध पासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 पॉक्सो या कायद्या अंतर्गत लैंगिक छळ म्हणजे काय तसेच या कायद्याअंतर्गत होणारी शिक्षा कोणत्या स्वरूपाची असते याचे स्पष्टीकरण देण्यात आले.त्याचप्रमाणे बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 च्या अनुषंगाने बालकांचे वय या संदर्भातील व्याख्या स्पष्ट करण्यात आली. बालविवाह रोखण्याकरिता ग्राम बाल संरक्षण समितीची भूमिका किती महत्वाची असणे गरजेचे आहे याचे स्पष्टीकरण देण्यात आले त्याच प्रमाणे किशोरवयीन बालकामगार कायदा अधिनियम 2016 च्या कायद्याची सविस्तर माहिती देण्यात आली या कार्यशाळेचे संयोजन संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी केले. सदरील कार्यशाळेमध्ये कोल्हापूर सांगली व सातारा येथील पंचवीस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता सातापा मोहिते यांनी अधिक परिश्रम घेतले.तसेच आभार प्रताप कांबळे यांनी मांडले.

Post a Comment

0 Comments