प्रमोद चिनके
सांगली जिल्हा प्रतिनिधी,
सांगली जिल्हा,
सांगली.
९४०५५५५५५७
सांगली शहर मध्ये १०० फुटी रोड ला आज सकाळी १० च्या सुमारास काशिम मंडप डेकोरेशन मध्ये मोठी आग लागल्याने मंडप साहित्याचे मोठे नुकसान झाल्याने मंडपाचे पूर्ण साहित्य नुकसान झाले असून त्या मध्ये लग्न मंडपाचे पडदे, गाद्या, डांब,पंखे, हे पूर्ण पणे जळून खाक झाले. ही आग इतकी मोठी होती की ती आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाडी मागविण्यात आले.
त्या रस्त्यावर जाणारे येणारे जनता असल्यामुळे त्या रस्त्यावर भयंकार गर्दी होती. पोलीस आल्याने गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस यांची मदत झाली.
शिवाय १०० फुटी हा रस्ता वाहतुकीचा असल्याने तेथे प्रचंड गर्दी झाली होती. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही आग कशामुळे लागली हे अजून पोलिसांचा तपास सुरू आहे.
0 Comments