Ticker

6/recent/ticker-posts

पिंपरी चिंचवड शहरात पाणीपुरवठा नियमित करा-मयुर पवार

 पिंपरी चिंचवड शहरात पाणीपुरवठा नियमित करा-मयुर पवार




पिंपरी चिंचवड शहरात पाणीपुरवठा नियमित करण्याबाबत निवेदन मयुर पवार यांच्या तर्फे आयुक्त राजेश पाटील साहेब यांना देण्यात आले व चर्चा केली.


निवेदनात असे नमूद केले की गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी पण पावसाचे प्रमाण चांगले आहे परंतु मागील वर्षापासून पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे . मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये पवना धरणात पाण्याची जी पातळी होती त्या पेक्षा या वर्षी पाण्याची पातळी वाढली आहे  . 




पावसाळ्यामध्ये पावसाचे पुरेसे पाणी असूनही एक दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहोत ही बाब निश्चितच खेदजनक आहे .

जरी 24 तास पाणी पुरवठा करणं शक्यं नसेल तरी रोजच्या रोज पिंपरी-चिंचवड शहरात नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात यावा अशी विनंती केली .या वेळी मयुर पवार यांच्या सोबत मनोज मुळे उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments