Ticker

6/recent/ticker-posts

कागल तालुक्यातील बेलवळे बेलवळे खुर्द येथे वैशिष्ट पूर्ण नागपंचमी ही १५०वर्ष परंपरा नुसार भक्तिमय वातावरण पार पडते .

 

कागल तालुक्यातील बेलवळे बेलवळे खुर्द येथे वैशिष्ट पूर्ण नागपंचमी ही १५०वर्ष परंपरा नुसार भक्तिमय वातावरण पार पडते .

कागल तालुक्यातील बेळवले खुर्द गावामध्ये रावसाहेब पाटील यांच्या घरामध्ये गेली १५० वर्ष नाग पंचमी दिवशी घरातील फळ्यावर नाग देवतांचे चित्र काडू न पूजा करण्यात येत असून याला मोठी परंपरा प्राप्त आहे. नाग पंचमी सना निमित्याने गावातील प्रत्येक जाती धर्माची लोक पाटील यांच्या घरी येऊन दरवर्षी नगोबाचे विशिष्ट असे चित्र काढतात आणि गावातील स्वभागीनी , लिकी , माघारणी एकत्र येऊन या नाग देवतांची पूजा भक्ती भावणे करतात निवेध वैगरे दाखवतात आणि गावातील लोक

भजन म्हणून भक्ती रंगात रंगून जातात. हे सर्व काही के प्रसन्न / भक्तिमय वातावरणात पार पडत असते. रावसाहेब पाटील येतील हे ग्राम पंचायत मध्ये कर्मचारी असून या अगोदर त्यांचे पणजोबा - आजोबा- वडील आणि आता वडीला बरोबर ते आपणहून ही पूजा पार पडतात. येतील लोकांच्या म्हणण्या नुसार आमचे ह्या नाग देवतांवर श्रद्धा असून इच्छा पूर्ण पूजा असते या मध्ये कोणताही अंध श्रद्धा नसून ज्याच्या त्याच्या कल्पने प्रमाणे असते आणि नाग हा शेतकऱ्याचा मित्र असून तो अन्न साखळीतील महत्वाचा घटक आहे त्यामुळे आम्ही भक्ती भावनेने पूजा करतो.

Post a Comment

0 Comments