* *लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने क्रांतीदिनी हुतात्मा स्मारकास अभिवादन*
प्रतिभानगर,
कोल्हापूर येथील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून लोकराज्य जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी अभिवादन केले यावेळी कोल्हापर शहर उपाध्यक्ष काकासाहेब भोकरे, शहर संघटक सुधाकर डोणोलीकर, आर.बी . पाटील, सुभाष भोसले , कादर जमादार आदि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी बोलताना लोकराज्य जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल चव्हाण म्हणाले,९ ऑगष्ट १९४२ रोजी स्वातंत्र्य चळवळीचा वणवा संपूर्ण देशभर पसरला या चले जाव क्रांतीलढ्यात देशाच्या कानाकोपऱ्यातील जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली आजच्या या क्रांती दिनातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले .

0 Comments