असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या पाल्ल्यांना अँड्रॉइड मोबाइल,लॅपटॉप,टॅब उपलब्ध करून देणेबाबत कामगारमंत्री यांना निवेदन;
रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री दिलीप कांबळे यांनी निवेदन दिले
देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट बळावत चालले आहे ,आशा या कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या मुलांना (बांधकाम कामगार ,घरेलू कामगार ,ऊसतोडणी मजूर ,रोजंदारीवर काम करणारे मजूर ,m i d c कामगार ) यांच्या मुलांना ऑनलाइन शिक्षण घेता यावं यासाठी शासनाकडून मोबाईल,लॅपटॉप, टॅब सारखी साधने मोफत देण्याची मागणी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, कोरोना महामारीमुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. परंतु असंघटित क्षेत्रात बांधकाम मजूर,ऊस तोडणी कामगार,घरेलू कामगार आशा कामगारांना आपल्या पाल्यांना ऑनलाइन शिक्षण कामी लागणारी उपकरणे देता येत नाहीत.कोरोनामुळे कामगारांच्या हाताला काम नाही ,कामगारांचे आर्थिक गणितच बिघडून गेले आहे ,त्यांचेवर उपासमारीचीवेळ आली आहे ,अशातच सरकारने ऑनलाईन शिक्षण चालू केले आहे,ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारे साहित्य परवडत नसलेने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यासाठी कामगार विभागाकडून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना ऑनलाइन साधने मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री. दिलीप हरी कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
0 Comments