शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगलीतील बसस्थानक संबंधी निवेदन....!
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा प्रतिनिधी,
सांगली जिल्हा ,
सांगली.
९४०५५५५५५७
शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगलीतील प्रलंबित बसपोर्टचे काम तात्काळ चालू करावे तसेच माधवनगर येथील एसटी महामंडळाच्या स्वतःच्या 10 एकर जागेतील बसस्थानकाचे काम तात्काळ चालू करावे तसेच सांगली-मिरज कुपवाड या तीनही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नवीन अत्याधुनिक सेंट्रल बसस्थानक करावे या मागणीचे निवेदन विभाग नियंत्रक अरुण वाघाटे सांगली यांच्याकडे बस पोर्ट माधवनगर बस स्थानक व नवीन सेंट्रल बसस्थानक संबंधी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा या संबंधित मागणी करण्यात आली सदरचे निवेदन सांगली तालुका प्रमुख अनिल शेटे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय नियंत्रक यांना देण्यात आले सदरच्या निवेदनाची कॉपी माननीय मुख्यमंत्री,परिवहन मंत्री,मुख्य सचिव, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, पालकमंत्री सांगली जिल्हा,तसेच कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम साहेब यांना निवेदन प्रत पाठवण्यात आल्या यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला बोलताना विभाग नियंत्रक सांगली अरुण वाघाटे साहेब यांनी सांगली येथील बसपोर्ट चा व स्वतंत्र माधवनगर बस स्थानकाच्या संबंधात दोन्ही बसस्थानकाचे एकत्रित निविदा काढल्यामुळे गोंधळ झाल्याने वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वानुसार दोन वेळा टेंडर काढले गेले पण एकत्रित निविदा काढल्यामुळे तसेच काही छोट्याशा त्रुटी राहिल्यामुळे टेंडरला प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले त्यामुळे येत्या आठवडाभरात आम्ही परिवहन खात्याला सदरच्या निवेदनाच्या अनुषंगाने सांगली बसपोर्ट व माधवनगर बसस्थानक या दोन स्वतंत्र निविदाचे टेंडर काढण्याचा पुन्हा नवीन प्रस्ताव आम्ही एसटी महामंडळ मुख्यालय मुंबई यांना सादर करून या दोन्ही बस स्थानकाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना शिष्टमंडळाला विभाग नियंत्रक सांगली जिल्हा अरुण वाघाटे साहेब यांनी सांगितले तसेच पुढे शिवसेना शिष्टमंडळाने विभाग नियंत्रक अरुण वाघाटे साहेब यांच्या असे लक्षात आणून दिले की सांगली मिरज कुपवाड या महापालिकेची लोकसंख्या शहर व परिसर मिळून 12 ते 15 लाखाच्या आसपास जाते त्या अनुषंगाने स्वतंत्र तीन बसस्थानक झाल्यास व विजयनगर येथे तीनही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नवीन सांगली-मिरज सेंट्रल बसस्थानक मंजूर झाल्यास परिसरातील जनतेची खूप मोठ्या प्रमाणात सोय होणार असून सदरच्या बसस्थानकाच्या माध्यमातून एसटी महामंडळाला खूप मोठा आर्थिक फायदा होणार आहे तसेच माधवनगर येथील महामंडळाच्या स्वतःच्या जागेत एसटी बसस्थानक उभा करण्यास एसटी महामंडळाला वापरा व हस्तांतरित करा तत्वानुसार टेंडर काढल्यास एक रुपया देखील खर्च महामंडळ येणार नसल्याने सरकारने तात्काळ याप्रश्नी लक्ष घालून सांगली मिरज कर जनतेचे सोयीसाठी प्रवाशांच्या सोयीसाठी तिन्ही स्वतंत्र बसस्थानकाचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे अशी उपस्थित शिवसैनिकांनी सांगितले
तसेच शिवसैनिक पुढे म्हणाले की या संबंधी शासन दरबारी सदरच्या बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत वारंवार प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी सांगली तालुका प्रमुख अनिल शेटे जितेंद्र शहा, सांगली जिल्हा संघटक प्रभाकर कुरळपकर, युवासेना सरचिटणीस राहूल यमगर, रावसाहेब घेवारे, शिवसेनेचे उपसरपंच माधवनगर बाळासाहेब मगदूम,लक्ष्मण वडर, प्रकाश लवटे,संदीप पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा प्रतिनिधी,
सांगली जिल्हा ,
सांगली.
९४०५५५५५५७
0 Comments