पाऊस फार झाला
पाऊस मुजोर झाला
पूर सैतानी येता
जिवाला घोर झाला...
दिसेना गांव कोठे?
बुडूनी पार गेला...
पाहूनी वार्ता पुराच्या
जीव बेजार झाला...
छावणी ती माळाची
गुरांना आधार झाला...
निसर्गापुढे लिन तो
मानवी अहंकार झाला...
संधी ही मदतीची...!
'सेल्फी व्यवहार' झाला...
कळेना पावसाने
कसा हा वार केला...?
जागच्या जागीच की
माणूस गार झाला...!!!
*@प्रा.दिलीप सुतार*
*कुरूंदवाड*

0 Comments