Ticker

6/recent/ticker-posts

**जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांचा सांगली दौरा*

जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्री एल एस कदम , महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष श्री सुजित भानुशाली , महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख श्री मयुर पवार हे सांगली जिल्हाच्या दौऱ्यावर आले असताना आज सांगली जिल्ह्यातील अनेक युवकांनी संघटनेमध्ये प्रवेश केला व पद्धधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली .


सांगली जिल्हा तर्फे आजवर केलेल्या सामाजिक कार्य , सर्वसामान्य लोकांचे सोडवलेल्या समस्या व भविष्यात नियोजित कार्य बद्धल चर्चा करण्यात आली व या वेळी संघटनेच्या वरिष्ठ पद्धधिकाऱ्यांनी संघटनेच्या ध्येय , धोरणांविषयी मार्गदर्शन केले.

या वेळी सांगली जिल्हा अध्यक्ष श्री सागर जंगम ,सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री श्रीकांत कोष्टी,सांगली जिल्हा सचिव श्री प्रभाकर स्वामी, पालघर जिल्हा अध्यक्ष श्री मनोज सूर्यवंशी,पालघर जिल्हा सचिव श्री कल्पेश पाटील, विक्रमगड तालुका अध्यक्ष श्री अमर भानुषाली ,विक्रमगड तालुका कार्याध्यक्ष श्री .सुरज भानुषाली या वेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments