Ticker

6/recent/ticker-posts

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत मयुर पवार यांच्या तर्फे निवेदन**

 **


गेल्या अनेक दिवसांपासून यमुनानगर निगडी येथे  मोकाट जनावरांचा वावर खूप वाढला आहे या विषयी आज पशुवैद्यकीय कार्यलयात मयुर पवार यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले .


निवेदनात असे नमूद केले की यमुनानागर निगडी येथे मोकाट जनावरांचा वावर खुप वाढला आहे आणि  ही जनावरे रोडच्या मधोमध ठाण मांडून बसलेली असतात.ही जनावरे नागरिकांना व वाहनांना पण घाबरत नाही .



या मुळे वाहतुकीला अडचण तर होतेच त्याचबरोबर वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागतात.अशावेळी अपघात होण्याची पण दाट शक्यता असते .मोकाट जनावरांचा धोका वाहनचालकां बरोबरच महिलांना, लहान मुलांना ,जेष्ठ नागरिकांना पण आहे.


पशुवैधकीय अधिकारी दगडे साहेब यांच्याशी या विषयी चर्चा केली व या विषयात लक्ष घालावे अशी विनंती केली.या वेळी सुनील घुले (पाटील) उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments