Ticker

6/recent/ticker-posts

पाऊस...माफिचा साक्षीदार पाऊस... 🌧️🌧️🌧️🌧️

पाऊस...माफिचा साक्षीदार
पाऊस...🌧️🌧️🌧️🌧️

असतो स्रुष्टीचा श्वास
सुखसम्रुद्धीचा भास
अन् जीवघेणा उच्छवासही...
पाऊस...
बदलतो गावांचे शहरांचे चेहरे मोहरे
भौगोलीक राजकीय आर्थिक नकाशे
अन् घडवतो इतिहासही...
पाऊस ...
देतो मधूर सहवास
गळ्याना गळफास...
अन् अनपेक्षीत वनवासही

पाऊस असतो प्रलंयकारी
पेरत जातो पायात भोवरे
वाहून नेतो गुरेढोरे...
अन् माणसांसोबत घरेदारेही...

पाऊस ...
असतो फिर्यादी
बेसुमार व्रुक्षतोडीचा
वाढत्या प्रदूषणाचा
सिमेंटच्या जंगलांचा
अन् वाढत्या लोकसंख्या विस्फोटांचाही...

पाऊस ...
बनतो माफिचा साक्षीदार
बेघर, बेकार ,निर्वासितांच्या
व्यथा वेदनांचा...
ओल्या सुक्या दुष्काळाचा...
त्यानंतरच्या महामारीचा....
आपद्ग्रस्तांच्या मदतीवरून
 रंगणा-या राजकिय कलगीतु-यांचा...
अन्...पूरग्रस्तांच्या
डोळ्यातील अश्रूंच्या महापूराचाही...!!!

                         *प्रा. दिलीप सुतार*
                             *कुरूंदवाड*

Post a Comment

0 Comments