वसुधा फौंडेशन,सांगली आणि शिवसेना यांच्या तर्फे पूरग्रस्तांना मदत...!
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा प्रतिनिधी,
सांगली जिल्हा,
सांगली.
९४०५५५५५५७
वसुधा फौंडेशन,सांगली आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त नागरिकांना सकाळचा चहा,नाष्टा,दुपारचे आणि रात्रीचे पोटभर जेवण देण्यात आले,याचा लाभ सांगली आणि मिरज शहरातील जवळ जवळ १०००(एक हजार)पूरग्रस्त नागरिकांना झाला,यावेळी लहान मूलांना पौष्टिक बिस्किटांचे देखिल वाटप करण्यात आले.
शिवसेना कुपवाड शहरप्रमुख रूपेश मोकाशी,शिवसेना सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख नानासाहेब शिंदे,शिवसेना विभाग प्रमुख व वसुधा फौंडेशन चे अध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवीण्यात आला.
आज या वेळी शिवसेना माजी शहरप्रमुख प्रसाद रिसवडे,वनाधिकारी शशीकांत देसाई,जयकुमार खोत,जयराम मुल्या,राजू सपकाळ,ओंकार देशपांडे,प्रशांत देशमुख,विठ्ठल संकपाळ,संदिप एडवान,अजिंक्य सुर्यवंशी,अमोल वाडकर,राहुल पाटील,गजानन माळी,वृषभ पाटील,अक्षय शितोळे इ.तसेच असंख्य शिवसैनिक,वसुधा फौंडेशन आणि गरूडझेप मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments